​आरोग्य विमा – आपल्या कठीण काळातील मित्र

व्यक्तिगतरित्या विचार केला तर आरोग्याशी संबंधित अडचणींचा परिणाम कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणे. आरोग्याशी संबंधित मुद्द्यांचा एखाद्या व्यक्तीवर वेगवेगळ्या तर्हेने परिणाम होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खच्चीकरण तर होतेच, त्याशिवाय वैद्यकीय उपचार, रुग्णालयात भरती आणि औषधांचा खर्च ह्या सगळ्या गोष्टींचा एखाद्या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबावर आर्थिकदृष्ट्याही मोठा परिणाम होऊ शकतो. आरोग्य विमा पॉलिसी ह्या सर्वातून बचाव करू शकते. या परिस्थितीमुळे आता विम्याचं महत्त्व कळायला लागलं आहे.

क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका

तुमच्यावर जर जास्त कर्ज असेल तर हा एक मानसिक ताण असतो. कर्ज फेडल्याशिवाय मानसिक ओझं हलकं होत नाही. तुमची क्षमता असेल तर घर, कार, दुचाकी अशी विविध स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्जापेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही. पण क्षमता नसेल तर कर्ज हे तुमच्यासाठी मोठं संकट ठरू शकतं. त्यामुळे ज्यांच्यावर कर्ज आहे, त्यांची चिंता वाढत आहे. म्हणूनच आपल्या क्षमतेएवढाच खर्च करण्याचं नियोजन आवश्यक आहे.

​मासिक बचत करणे

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला फारशी अडचण येत नाही. विशेषतः करोनासारख्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे पुरेशी बचत असेल तर घरात राहूनही तुम्ही काही दिवस स्वतःच्या गरजा भागवू शकता. अचानक नियमित उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्यानंतर ही बचत तुमच्यासाठी संजीवनी देणारी ठरते. किमान आपल्या सहा महिन्यांची गरज भागू शकेल, एवढी बचत करणं आवश्यक आहे.

​​गुंतवणुकीत विविधता

करोना विषाणूमुळे शेअर बाजार, रोखे, बँका, पोस्ट, धातू, स्थावर मालमत्ता आदी गुंतवणूक पर्यायांवर सकारात्मक आणि विपरीत असे परिणाम सध्या झाले आहेत. अशामुळे आपली गुंतवणूक अर्थात ज्यांनी विभागून केली असेल त्यांना साहजिकच काळजी वाटू शकते. पण, गुंतवणूक विभागून करणे हाच योग्य पर्याय आहे

​पोर्टफोलिओ संतुलन महत्त्वाचे

एसआयपीच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करावी. अॅसेट अॅलोकेशन महत्त्व दिले पाहिजे. इक्विटी, डेट, रिअल इस्टेट यांजबरोबर सोने ही वस्तू गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केली पाहिजे. पोर्टफोलिओ संतुलनाला महत्त्व द्या.

आणि हे सर्व समजून घेण्यासाठी तज्ञ सल्लागाराचा सल्ला घ्यायला विसरू नका !!

अभिप्राय द्या!