सर्वसाधारण विमा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात थेट प्रिमीयमचे ढोबळ उत्पन्न 133 अब्ज 13 कोटी रुपये एवढे नोंदविले आहे. तर करोत्तर नफा 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 13.8 टक्क्यांनी वाढून 10 अब्ज 49 कोटींवरुन 11 अब्ज 94 कोटी रुपयांवर झेपावला आहे.
 
करोनाचे संकट तसेच अर्थव्यवस्थेपुढे असलेल्या अनेक आव्हानांमुळे  थेट प्रिमीयमच्या ढोबळ उत्पन्नात गेल्या वर्षाच्या तुलनेत 8.1 टक्के घट झाली आहे. 2019 मध्ये हेच उत्पन्न 144 अब्ज 88 कोटी रुपये एवढे होते. परंतु पीकविमा क्षेत्र वगळल्यास याच उत्पन्नात 2019 च्या तुलनेत तब्बल 10.5 टक्के वाढ झाली आहे. हे उत्पन्न 120 अब्ज 36 कोटींवरुन 133 अब्ज कोटींवर गेले आहे. सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपन्यांच्या वाढीइतकी वाढ राखण्यात आययीआयसीआय लोम्बार्ड  जनरलला यश आले आहे.

अभिप्राय द्या!