या दीर्घकालीन लॉकडाउनमुळे उद्योग व्यवसाय संकटात सापडले आहेत. नोकर कपात तसेच वेतन कपातीची टांगती तलवार सध्या कर्मचाऱ्यांवर आहे. सक्तीची रजा, पगाराविना रजेमुळे भविष्यात आर्थिक संकट वाढेल. अशा परिस्थितीत मानसिक तणाव वाढला आहे. करोनामुळे आर्थिक स्थिती आणखी बिकट होणार आहे. याचा किती परिणाम होईल, याचे अंदाज बांधले जात आहेत. प्रत्येकासाठी ही परिस्थिती वेगवेगळी आहे. येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी काही पथ्य पाळणे आवश्यक आहे. स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियांना या महासंकटातून वाचवण्यासाठी सज्ज व्हायला हवं. पुढील काही गोष्टी अंगिकारल्या तर करोनापासून होणार टाळता येईल.
निराश होऊ नका, स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
अवास्तव खर्चाला नियंत्रणात ठेवा
खर्चाचा फेरआढावा घ्या
आपत्कालीन निधी नसल्यास गुंतवणूक वापरा
आणि यासंबंधातील अधिक माहितीसाठी धनलाभ कार्यालयाशी संपर्क साधा !!