हल्लीच लोणावळा येथे गेलो असताना कैवल्याधाम पाहिले. १९२४ साली स्थापन झालेली ही संस्था प्रसिद्ध योग केंद्र आहे व योगामुळे प्रकृती स्वास्थ्य छान राहते याचा प्रचार ही संस्था करते. आणि चांगले आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे मानतात. पण ———-
आजकाल कुठल्याही लहानसहान आजारपणाचा खर्च हा कल्पनेपेक्षा वाढता झाला आहे.गेल्याच वर्षी माझ्या एका मित्राच्या मुलीचे बाळंतपण झाले , सो called नॉर्मल delivery!! खर्च – फक्त इस्पितळाचा – रू. ६८००० / – !! पूर्वकल्पना असेल तर माणूस अश्या आकस्मिक खर्चाला सामोरा जातो अन्यथा त्याला हातउसने / छोटे कालावधीचे कर्ज या बाबी करणे प्राप्त होतेच!!
किरकोळ पोटदुखीचा त्रास म्हणून OPD मध्ये तपासणीसाठी जावे तो डॉक्टर आपल्याला सर्व तपासण्या करायला सांगतात व नंतर साधेसे ऑपरेशन ! खर्च रू दोन लक्ष ! नाही केल्यास जीवावर बेतेल अशी सर्वजण भीती घालतात !!
आरोग्य सुविधांमध्ये हरक्षणी होणाऱ्या तांत्रिकी सुविधांपायी “आयुष्य कालावधी “ सुसह्यपणे वाढला आहे, फक्त आर्थिक सुबत्ता हवी . ती असल्यास तंत्रज्ञ व ज्ञान हात जोडून उभे राहू शकते.व ही सुबत्ता आपण योग्य गुंतवणुकीतून प्राप्त करू शकतो.
योग्य वेळी ,योग्य तरतुदी असलेले “आरोग्य विमा कवच” असले की झाले. अर्थात mediclaim policy.
या अंतर्गत फक्त कर्त्या पुरुषानेच आपल्याला कवच घेणे आवश्यक नसून घरातल्या स्त्रीचे आरोग्य जपणे हेही तेवढेच महत्वाचे असते .म्हणून पूर्ण family कवच असलेली mediclaim policy संपूर्ण कुटुंबासाठी घ्यावी .
कर्त्या व्यक्तीने किवा स्त्रीने अशी policy लहान वयात घेतल्यास ह्याचे premium सुद्धा कमी व सोपे असतात . तसेच यामध्ये ७० वयापर्यंतच्या वृद्ध पालकानाही cover मिळू शकते. काही कंपन्या तर अधिक खर्चासाठी riders सुद्धा देवू करतात. फक्त हे सर्व स्वीकारताना स्वतः आपल्या गरजांचा अभ्यास करणे आवश्यक असते.
एखादी scheme किफायतशीर वाटली तरी स्वीकारण्यापूर्वी त्याचा claim settelment रेशो पाहणे अत्यंत हितावह आहे . नाहीतर प्रतिनिधी आपला स्वतःचा फायदा पाहणारच ! हल्ली online compare सुविधेमुळे अभ्यासू व्यक्तीला सर्व तौलानिकता पाहून निर्णय घेणे सोपे झाले आहे . या बाबतीत सल्लागारसुद्धा चांगली मदत करतात . पण आपण प्रतिनिधीच्या आहारी जाऊ नये , हे महत्वाचे !!
policy घेताना वगळलेल्या बाबी तपासणे महत्वाचे , तसेच कॅशलेस सुविधा व remote area हॉस्पिटल प्रवेश तपासणेही तेवढेच महत्वाचे आहे ! अनेक policy मध्ये दंतसेवा मात्र अजूनही नसते. एकटे पालक , अविवाहित स्त्री , नवविहावीत जोडपे , कॅशलेस बाळंतपण ह्या सुविधाही सध्या उपलब्ध होताहेत.
माझ्या अनुभवाप्रमाणे TATA AIG / ICICI lombard या कंपन्या अनेक बदल वेळोवेळी करतात, त्यामुळे अनेक सुविधा व अनेक इस्पितळातील प्रवेश उपलब्ध असलेल्या आरोग्य विमा सुरक्षा policy घेणे अत्यंत हितावह होऊ शकते .
व सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व policy ना 80D अंतर्गत deduction सुद्धा असते !!
Pl suggest few names of mediclaim policies here. It will help us to compare our existing policy with that and can opt for that.