कोरोना विषाणूचा जागतिक विळखा वाढत असतानाही जागतिक शेअर बाजार वाढत आहेत.
युरोपीयन, अमेरिकन व आशियाई बाजार वाढत आहेत. अमेरिकन ’नॅसडॅक’ हा निर्देशांक त्याच्या सर्वोच्च पातळीपासून केवळ ५.५ टक्के दूर आहे.
मात्र, आपला राष्ट्रीय निर्देशांक अर्थात ‘निफ्टी’ त्याच्या सर्वोच्च पातळीपासून २५.५८ टक्के दूर आहे.
जागतिक बाजार वाढताहेत, याचा अर्थ जागतिक पातळीवरील कोरोना संकट संपले असे नाही. जगाचा विचार करता या रोगाच्या बाधीतांची संख्या ४० लाखांजवळ असून तो अजूनही ६०-६५ अंशाच्या रेषेत वाढत आहे. तसेच मृतांचा (२६९०६८) आकडाही त्याच रेषेत वाढत आहे. असे असले तरी प्रतिदिन बाधित होणार्यांची संख्या ५ एप्रिल (८६,४८४) नंतर आज (९४,१५८) पर्यंत आडव्या रेषेत आहेत. प्रतिदिन मृत होणार्यांची संख्याही १६ एप्रिल (१०,५२०) पासून आजपर्यंत (५,७८०) खालच्या दिशेने आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पुन्हा कामकाज सुरू होताना दिसत आहे. जागतिक शेअर बाजार वाढत आहेत, तोपर्यंत आपला बाजार (निफ्टी) ८,८९० ते ९,८३० अंश या पातळीत राहण्याची शक्यता आहे. मात्र, जागतिक बाजारात पुन्हा करेक्शन सुरू झाल्यास आपला बाजारही (निफ्टी) ८,०६० अंशापर्यंत घसरण्याची शक्यता अधिक राहील.
निफ्टीची घसरण ८,०६० अंशापर्यंत झाल्यास, या पातळीपासून बाजारत मोठी वाढ होण्यास सुरवात होऊ शकते. यामुळे सध्याच्या करेक्शनमुळे उच्चतम कंपन्याच्या शेअर्सचे भाव एकदम ५० टक्क्यांपर्यंत घटले आहेत. यामुळे निफ्टी ८०६० पर्यंत खाली येऊन वरच्या दिशेने निघाल्यास या
सर्वात मोठया व उत्तम प्रतीचे कामकाज असणार्या कंपन्यंचे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही. या गुंतवणुकीवर वर्षभरात ४० ते ५० टक्के परतावा मिळण्याचे शक्यता अधिक आहे. साधारणता आयआरसीटीसी, पीव्हीआर, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी, आयबुलहाऊसिंग फायनान्स, एचडीएफसी बँक, किर्लोस्कर इंजिन या कंपन्या गुंतवणुकीस योग्य आहेत.