अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील प्रमुख घोषणा
प्राप्तिकर
– प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ
– टॅक्स ऑडिट करण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविली
भविष्य निर्वाह निधी
– प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजतंर्गत पीएफ फंडात कंपनीकडून देण्यात येणारे 12 टक्के आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे 12 टक्क्याचा भार सरकार उचलणार
-मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरकार पीएफ भरणार आहे. त्यात आणखी तीन महिन्यांनी वाढ.
आता जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पीएफचा भार सरकार उचलणार
-उद्योगांना 2500 कोटी रुपयांचा फायदा होणार
– 3.67 लाख कंपन्यांना थेट फायदा मिळणार
– कंपन्यांमधील 72.22 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार
करदात्यांना दिलासा
टीडीएस आणि टॅक्स कलेक्शन अँट सोर्समध्ये कराच्या दरात 25 टक्के कपात करण्यात आली आहे.
यामध्ये करार, प्रोफेशनल फी, व्याज, भाडे, लाभांश, कमिशन, ब्रोकरेज हे कमी केलेल्या टीडीएससाठी पात्र असतील.
ही कपात चालू आर्थिक वर्षात 14 मे पासून 31 मार्च 2021 पर्यंत लागू असेल.
रेराअंतर्गत गृहप्रकल्पांना मुदत वाढ
– रेराअंतर्गत गृहप्रकल्पांच्या नोंदणी आणि पूर्णत्वाकडे आलेल्या प्रकल्पांना मुदत वाढ
– 25 मार्च 2020 किंवा त्यांनतर मुदत संपणाऱ्या गृह प्रकल्पांना 6 महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
– गृहप्रकल्प निर्मात्यांना यामुळे दिलासा मिळेल. तसेच घर खरेदी करणाऱ्यांना मात्र नवीन वाढवलेल्या मुदतीत घरे मिळतील.