उगम करात (टीडीएस) आणि टीसीएसमध्ये कपात करण्यात आली असून ही कपात गुरुवारपासून लागू करण्यात आली आहे. ही करकपात ३१ मार्च २०२१पर्यंत लागू असणार आहे. एकूण २३ करपात्र गोष्टींवरील टीडीएस कमी करण्यात आला आहे. टीडीएस व टीसीएसमध्ये कपात केल्यामुळे करदात्यांच्या हातात सुमारे ५० हजार कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.
तेंदूच्या पानांची विक्री, भंगाराची विक्री, लाकूडविक्री, जंगलातील उत्पादनांची विक्री तसेच दगडी कोळसा, लिग्नाइट किंला लोह यांची विक्री यांवर लागू होण्याऱ्या टीसीएसमध्येही कपात करण्यात आली आहे. मात्र पॅन व आधार क्रमांक सादर करू न शकलेल्या करदात्यांसाठी टीडीएस व टीसीएसमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
टीडीएस व टीसीएल कमी करण्यामागे केंद्र सरकरचा उद्देश करदात्यांच्या हातात खर्चण्यायोग्य पैसा उपलब्ध करून देणे हा आहे. करोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्व बाजार बंद आहे. अशा स्थितीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लोकांच्या हातात पैसा उपलब्ध करून देऊन, त्याद्वारे बाजारातील उलाढालीला चालना देणे आवश्यक आहे. यासाठीच सरकारने हा निर्णय घेतल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच असे केल्यामुळे प्राप्तिकर विभागावर कर परतावा (रिफंड) देण्याचा दरवर्षी पडणारा ताण काही प्रमाणात सुसह्य होणार आहे.