आजकालच्या जीवनात अनेक प्रकारे “बदला” घेता येतो. सिनेमात खलनायक सुरुवातीला नायकावर कुरघोडी करतो, पण नंतर नायकच त्या कुरघोडीचे रुपांतर बदल्यात करतो.

राजकीय नेते तर वेळोवेळी अनेक प्रकारे अनेकांशी बदला घेत असतात.  इथे मात्र अशा प्रकारचा बदला घ्यायला मी सुचवत नाही!     पण —————-

अर्थसाक्षर होण्यासाठी आपली मानसिकता बदलण्याचे मी आवाहन करतो.

IPPB म्हणेच पोस्ट ऑफिस तर्फे बँकिंग सेवा सुरु सुरु होणार असे सर्वांना समजले आहे पण, कालच, याद्वारे पोस्ट ऑफिस, म्युच्युअल फंड विक्री आणि विमा क्षेत्रात उतरत असल्याचे वाचनात आले. साधारणपणे ५० पेक्षा अधिक म्युच्युअल फंड हाऊसने पोस्ट ऑफिसद्वारे आपला व्यवसाय वाढविण्याचे व विस्तारण्याचे ठरवलेले दिसत आहे.

पोस्ट ऑफिसचा ग्रामिण भागातील पाया पाहता म्युच्युअल फंड व्यावसायिकांना अधिक विस्तारण्याची संधी याद्वारे  मिळणार   आहे.

या पाठीमागील महत्वाचा मुद्दा म्हणजे बचत ठेवीवरील घटणारे व्याजदर.  NSC, KVP, सिनियर सिटीझन ठेव, सुकन्या समृध्दी, व PPF या पोस्टाच्या अनेक वर्षे अनेकांना आवडणाऱ्या सेवा.

ठेवींचे व्याज सरकारच ठरवते व ठेवींचा विनियोग कोठे करावं हेही सरकारच ठरवते. या ठेविमधील  सन १५-१६ मधील तफावत रू १३.५ हजार कोटी आहे, सन १६-१७ मध्ये व्याजदर कमी झाल्याने ही तफावत ५००० कोटी झाली आहे. एकंदर संचयित  तूट १ लाख १०हजार  कोटी पर्यंत पोहोचली आहे!!  त्यामुळे येत्या २ वर्षात या सर्वांना आवडणाऱ्या, योजनांचे व्याजदर किमान १% पेक्षा जास्त कमी होण्याची शक्यता आहे,व इथेच या अल्पबचत ठेवितील सर्व गुंतवणूकदारांनी आपली मानसिकता बदलून अधिक उत्पन्न देणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रोतांकडे वळण्याची गरज आहे.

याची सुरुवात किमान बॅलन्स्ड फंड व DEBT  फंडातील SIP द्वारे  केल्यास कोणत्याही प्रकारचे  नुकसान होणार नाही.आणि यासाठीच  म्युच्युअल फंड हाउसना  आपल्या योजनाच्या    विक्रीसाठी सरकारमान्य पोस्ट ऑफिसचा पाया, एप्रिल  २०१८ पासून वापरायला रिझर्व बँकेनेसुद्धा मान्यता दिली आहे.

म्हणूनच  म्हणतो,  आपली बचत गुंतवणूकीत रुपांतरीत करण्यासाठी आपली मानसिकता आपणच बदलली पाहिजे.

अभिप्राय द्या!