कॅनरा बँकेने सध्याच्या आव्हानात्मक स्थिती आणि अनिश्चिततेवर मात करण्यासाठी व्यावसायिकांसाठी विशेष सुवर्णकर्ज योजना सुरू केली आहे. ग्राहकांना कमी व्याजदरात जलदरीत्या आणि सोप्या पध्दतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा बँकेने सुरू केली आहे. या कर्जामुळे ग्राहकांची खेळत्या भांडवलाची गरज भागवली जाऊन त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढवण्याकरता आवश्यक रक्कम मिळणार आहे. बँकेने ३० जूनपर्यंत विशेष सुवर्णकर्ज मोहीम सुरू केली असून याकरता ७.८५ टक्के वार्षिक व्याजदर आकारण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या!