‘यूटीआय व्हॅल्यू अपॉर्च्युनिटीज फंड’

बाजारात साधारणपणे संपूर्ण व्याप्ती असलेल्या गुंतवणुकीच्या संधी शोधणारा फंड आहे.

आपल्या अंगभूत मूल्यापेक्षा कमी किंमत असणाऱ्या शेअर्सचा शोध घेऊन, ते शेअर कोणत्याही ‘मार्केट कॅप’मध्ये असले तरी, त्यांच्यात गुंतवणूक करण्याची संधी हा फंड घेत असतो. हे खरे तर ‘मल्टी कॅप’ फंडाचे लक्षण आहे. आपल्या समभागधारकांसाठी कंपनीने विशिष्ट काळात उभारलेल्या रोखीची वर्तमान किंमत म्हणजे त्या शेअरचे अंगभूत मूल्य होय. कमी मूल्यमापन झालेल्या दोन प्रकारच्या कंपन्या बाजारात साधारणपणे आढळून येतात. एखाद्या कंपनीची स्पर्धात्मक शाश्वती बाजाराला कमी वाटली आणि / किंवा त्या कंपनीची प्रगती होण्यास फार काळ लागणार असल्यास संबंधित कंपनीच्या शेअरचे मूल्य कमी गणण्यात येते. अशा कंपन्या बाजाराच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या प्रवाहानुसार चाललेल्या नसतात आणि बाजारातील सरासरी किंमत त्या गाठू शकत नाही. दुसरीकडे, काही कंपन्यांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहांमुळे, बाजारातील वातावरणामुळे किंवा भूतकाळातील काही घटनांमुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असतो. तथापि या कंपन्यांचा मूळ व्यवसाय उत्तम स्वरुपाचा असेल, त्यांच्याकडे रोख गंगाजळी व परताव्याची शाश्वती चांगली असेल, तर या कंपन्यांचे घसरलेले शेअर विकत घेण्याची ती चांगली संधी असते. अपेक्षांच्या तुलनेत स्वस्त काहीतरी खरेदी करण्याची संधी या दोन्हींबाबतीत असते.

‘यूटीआय व्हॅल्यू अपॉर्च्युनिटीज फंड’ 2005 मध्ये सादर करण्यात आला. या फंडाकडे 3,700 कोटी रुपयांचे एयूएम आहे. तसेच 30 एप्रिल 2020 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, फंडाच्या युनिटधारकांच्या खात्यांची संख्या 4.7 लाख इतकी आहे. या फंडाच्या ‘पोर्टफोलिओ’मध्ये ‘लार्ज कॅप’ कंपन्यांचे प्रमाण अधिक असले, तरी ‘मिड कॅप’ कंपन्यांचे प्रमाणही त्यांच्या मूल्यांकनानुसार कमी जास्त होऊ शकते. 30 एप्रिल 2020 पर्यंत या फंडातर्फे ‘लार्ज कॅप’ कंपन्यांमध्ये सुमारे 71 टक्के गुंतवणूक झाली असून उर्वरित गुंतवणूक ‘मिड’ आणि ‘स्मॉल कॅप’ कंपन्यांमध्ये झालेली आहे. या योजनेच्या अग्रभागी एचडीएफसी बँक लि., आयसीआयसीआय बँक लि., इन्फोसिस लि., भारती एअरटेल लि., अॅक्सिस बँक लि., आयटीसी लि., कोरोमंडल इंटरनॅशनल लि., जुबिलंट फूडवर्क्स लि., सन फार्मास्युटिकल्स लि. आणि एस्कॉर्ट्स लि. या दिग्गज कंपन्या आहेत. फंडाच्या ‘पोर्टफोलिओ’मध्य़े त्यांचा वाटा 47 टक्के इतका आहे.

चांगला ‘इक्विटी पोर्टफोलिओ’ तयार करू इच्छिणाऱ्या आणि दीर्घकालीन भांडवली वाढीची अपेक्षा बाळगणाऱ्यांसाठी ‘यूटीआय व्हॅल्यू अपॉर्च्युनिटीज फंड’ योग्य ठरू शकतो. मध्यम स्वरुपाची जोखीम घेऊ शकणाऱ्या व बाजारातील परिस्थितीनुसार मध्यम ते दीर्घ मुदतीपर्यंत वाजवी परतावा हवा असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीदेखील हा फंड उपयुक्त ठरेल.

अभिप्राय द्या!