आयसीआयसीआय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) योजना सुरू केल्याचे आज जाहीर केले आहे. ‘आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स एफडी असे नाव असणारी ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या आणि पाच वर्षांहून अधिक ते 10 वर्षे या कालावधीच्या ठेवींवर दरवर्षी 6.55% व्याजदर देणार आहे.

मे 20 ते सप्टेंबर 30, 2020 या कालावधीमध्ये उपलब्ध असणारी आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स एफडी संबंधित कालावधीसाठी व संबंधित रकमेसाठी सर्वसाधारण लोकांना (ज्येष्ठ नागरिक नसणारेलागू असणाऱ्या व्याजदरापेक्षा 80 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) अधिक देणार आहे. तसेचबँकेने आधी जाहीर केलेल्या व्याजदरापेक्षा हा दर 30 बीपीएस अधिक आहे. निवासी ज्येष्ठ नागरिकांना नव्या एफडींसाठी व एफडींच्या नूतनाकरणासाठी या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

आयसीआयसीआय बँकेचे लाएबिलिटीज ग्रुपचे हेड प्रणव मिश्रा यांनी या उपक्रमाविषयी बोलताना सांगितले, “आयसीआयसीआय बँकेमध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी असलेले नाते सदैव जपतोअसंख्य ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवरील व्याज हे उत्पन्नाचे मुख्य साधन असते. हे विचारात घेता, सध्या व्याजदर घटत असतानाही, आम्ही त्यांना नवीन योजनेद्वारे अधिक व्याजदर देणार आहोत. या योजनेमुळे त्यांना त्यांच्या दीर्घकालीन ठेवीवर उत्तम पेन्शन रक्कम मिळू शकेल आणि त्यांना मोठी मदत होईल, असे वाटते.“

 

योजनेची ठळक वैशिष्ट्ये:

·         अधिक व्याजदर: निवासी ज्येष्ठ नागरिकांना वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे या कालावधीच्या एफडींसाठी अधिक व्याजदर मिळवचा येईल. ही योजना 2 कोटी रुपयांपेक्षा सिंगल एफडीवर लागू आहे.

·         कालावधी: ही योजना मे 20 ते सप्टेंबर 30, 2020 या कालावधीमध्ये उपलब्ध आहे.

·         नव्या व जुन्या एफडींसाठी: ही नवी योजना नव्या एफडीवर व एफडींच्या नूतनीकरणावर लागू आहे.

·         एफडीवर कर्जग्राहकांना एफडीची मुदद्ल व संकलित व्याज या रकमेच्या 90% रकमेपर्यंत कर्ज घेता येऊ शकते.

·         एफडीवर क्रेडिट कार्ड: ग्राहकांना त्यांच्या एफडीवर बँकेकडे क्रेडिट कार्डासाठी अर्ज करता येऊ शकतो.

अभिप्राय द्या!