प्रामुख्याने मुदत ठेवीच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर अवलंबुन असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून देशातील आघाडीच्या बँका एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना आणल्या आहेत. या योजनांचा थोडक्यात घेतलेला आढावा:
 
एसबीआयची ‘वी केअर’ योजना
एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार ही योजना सर्वसामान्यांना लागू असलेल्या व्याज दरापेक्षा 0.8 टक्क्यांनी अधिक व्याज देणार आहे. म्हणजेच सर्वसामान्यांना मिळणाऱ्या 5.7 टक्क्यांऐवजी ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर  6.5 टक्के व्याज मिळेल. तसेच जर पॉलिसी मॅच्युअर होण्याअगोदर एफडीतील गुंतवणूक काढून घ्यायची असेल तर 6.5 टक्क्यांऐवजी 6.2 टक्के इतकेच अधिकचे व्याज मिळणार आहे.
वी केअर योजनेत कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 10 वर्षांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम एफडीमध्ये गुंतविता येणार आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

अभिप्राय द्या!