एचडीएफसी बँकेची ‘सिनिअर सिटीझन केअर एफडी’
या योजनेअंतर्गत 2 कोटींपर्यंतची एफडी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना देखील 6.50 टक्के व्याज मिळणार आहे. या अगोदर सामान्य गुंतवणूकदारांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के म्हणजे 6.25 टक्क्यांचे व्याज मिळत होते. मात्र आता बँकेने त्यात 0.25 टक्क्यांची अधिकची वाढ केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना 6.50 टक्के इतके व्याज मिळेल.
दरम्यान योजना मॅच्युअर होण्याअगोदर गुंतवणूक काढून घ्यायची असल्यास एकूण मिळणाऱ्या व्याजात 1 टक्कयांनी घट होईल.
 
आयसीआयसीआय बँकेची गोल्डन इयर्स एफडी’
गोल्डन इयर्स एफडी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या आणि पाच वर्षांहून अधिक ते 10 वर्षे या कालावधीच्या ठेवींवर दरवर्षी 6.55 टक्के व्याज मिळेल. मे 20 ते सप्टेंबर 30, 2020 या कालावधीमध्ये उपलब्ध असणारी ‘आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स एफडी’ संबंधित कालावधीसाठी व संबंधित रकमेसाठी सर्वसाधारण लोकांना (ज्येष्ठ नागरिक नसणारे) लागू असणाऱ्या व्याजदरापेक्षा 80 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) अधिक देणार आहे. तसेच, बँकेने आधी जाहीर केलेल्या व्याजदरापेक्षा हा दर 30 बीपीएस अधिक आहे. निवासी ज्येष्ठ नागरिकांना नव्या एफडींसाठी व एफडींच्या नूतनाकरणासाठी या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

अभिप्राय द्या!