आयडीएफसी फर्स्ट बँकेने आज ऑनलाइन बचत खाती उघडण्याच्या दिशेने व्हिडिओ केवायसी सुरू करण्याची घोषणा केली. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत डिजिटल प्रवास बचत खाते उघडणे सुखद बनवतो, कारण तो ग्राहकांना कागदविहीन केवायसी प्रक्रिया अंदाजे दोन मिनिटांत पूर्ण करून आणि बचत खात्यातील शिल्लक रकमेवर या व्यवसायातील सर्वोत्कृष्ट व्याज दराचा लाभ मिळवून देतो.
 
डिजिटल सुविधा ग्राहकांना घरबसल्या शाखा-सदृश अनुभव देऊ करते ज्यायोगे ग्राहकांना अक्षरशः त्यांना सोयीस्कर असलेल्या वेळेवर बॅंकर्सना भेटणे शक्य होते. शून्य संपर्क पद्धत कागदपत्रांचे कार्य किंवा बायोमेट्रिक पडताळणीस पूर्णपणे दूर ठेवते, ज्यायोगे केवायसी प्रक्रियेतून बँक आणि ग्राहक यांच्यात शारिरीक संवाद काढून टाकणे आवश्यक होते.
 
महामारीने ग्राहकांच्या त्यांच्या बँकांशी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल केला आहे कारण ते आता व्यवहारांसाठी अधिकाधिक डिजिटल आणि मोबाईल वाहिन्यांवर अवलंबून असतात. नवीन डिजिटल अनुभव निर्माण करण्यात अग्रभागी असलेली बँक म्हणून, आयडीएफसी फर्स्ट बँकेने, सामाजिक अंतर राखणे शक्य करतानाच, ग्राहकांना वैयक्तिकृत मानवी सहाय्य देऊन, या वाढत्या गरजेला त्वरित प्रतिसाद दिला आहे.

अभिप्राय द्या!