केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विषय  प्राधान्यक्रमावर असून, गरज पडल्यास मोठ्या कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्यासाठीच्या नियमांमध्ये बदलही करण्यात येण्याची शक्यता आहे.

सध्या केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर रोख रकमेची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे निर्गुंतवणूक करण्याची प्रक्रिया वेगवान होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका पार पडत असून, निर्गुंतवणूक करावयाच्या कंपन्यांची नवी यादी तयार करण्यात येत आहे.

एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आगामी काळात प्राधान्याने एअर इंडिया आणि बीपीसीएल यांची निर्गुंतवणूक प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या तयारीत आहे.

अभिप्राय द्या!