एखाद्या विशिष्ट क्षेत्रात वृद्धी होताना दिसत असली किंवा मार्केटमध्ये मोठी वाढ होत असली तरीही काही क्षेत्रांमधील ट्रेंड घसरता असतो.
सध्या स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. मागील सलग दोन महिन्यात त्यांचे मूल्य जवळपास एक चतुर्थांशांनी कमी झाले आहे. तर दुसरीकडे फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये याच स्थितीत मोठी वाढ झाली आहे. एफएमसीजी सेक्टरसाठीही ही गोष्ट लागू आहे. त्यामुळे एक  गुंतवणूकदार या नात्याने मार्केट कोसळत असतानाही कमीत कमी नुकसान झेलण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओत विविधता हवीच.
पोर्टफोलिओ बांधणी हे काही रॉकेट सायन्स नाही. यासाठी योग्य घटक कोणते आहेत, त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. विविध उद्योग, व्हर्टिकल्स आणि रेग्युलेटरी फ्रेमवर्क, कंपनीचे व्यवस्थापन (प्रमुख भागधारकांसह), मागणी-पुरवठ्याचे पैलू आदी संबंधित घटकांद्वारे बाजार पूर्णपणे समजून घेणे शक्य आहे. हे एखाद्या घड्याळाप्रमाणे एकमेकांच्या संयोगाने काम करतात. तुम्ही जेवढ्या सूक्ष्मरितीने हे समजून घ्याल, तितके अचूक मूल्यांकन करू शकाल.
 
तुमचे विविधीकरण हे पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक गुंतवणूक धोरणांवर अवलंबून असते. ही विविधता क्षेत्रांबाबत, मार्केट कॅपिटलायझेशन (लार्ज कॅप/मिड कॅप/ स्मॉल कॅप), किंवा गुंतवणूकीची साधने या सर्वांसंबंधी असू शकते. उत्कृष्ट विविधता असलेल्या पोर्टफोलिओमध्ये सिक्युरिटीज (विविध क्षेत्र आणि कंपनीच्या आकारासंबंधी). कमोडिटीज ( सराफा आणि बेस मेटलसह ) आणि चलन या सर्वांचे वैविध्य असते. उदाहरणार्थ, भारतातील कोरोना व्हायरसचे लॉकडाउन ३१ मे २०२० रोजी संपणार असे म्हटले जातेय. तथापि, उत्कृष्ट गुंतवणूकदार पर्यायी स्थितीही लक्षात घेतो आणि त्यानुसार आपल्या पोर्टफोलिओमध्ये संतुलन साधतो.
गुंतवणूक करताना  ध्येय निश्चित करणे आवश्यक असते तसेच भावनिक गोष्टींमध्ये अडकून न पडता स्वतःचे नुकसान टाळणे देखील महत्वाचे असते.
आपल्या गुंतवणुकीचा प्लॅन, प्राधान्यक्रम आणि जोखिमीची तयारी  यानुसार विविधीकरण करणे हा  तुमचा निर्णय असतो.
एकाच क्षेत्रात किंवा मालमत्ता प्रकारात कधीही गुंतवणूक करू नये . यामुळे तुमची जोखीम वाढते. एक गुंतवणूकदार या नात्याने बाजाराची जेवढी अधिक माहिती तुम्ही ठेवाल, तेवढे चांगले शेअर्स किंवा मालमत्ता तुमच्याकडे असेल.
आणि यासाठी बाजारात होणार्या लहासहान बाबींची सुद्धा नोंद ठेवणे अत्यावश्यक असते , हे सर्वांनी ध्यानी घ्यावे !!

Leave a Reply