असे मिळवा ई-पॅन
- ई-पॅनसाठी सर्वप्रथम प्राप्तिकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा.
-
ही वेबसाइट उघडल्यावर डावीकडे असलेल्या पर्यायांमधून instant PAN through Aadhar या पर्यायावर क्लिक करा.
-
त्यानंतर Get New PAN वर क्लिक करा.
-
तुमचा १२ आकडी आधार क्रमांक टाइप करा.
-
तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेला तुमचा मोबाइल क्रमांक असेल, तर त्या क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) येईल. तो क्रमांक भरा.
-
प्राप्तिकर विभागातर्फे पोचपावती म्हणून १५ आकडी पोचक्रमांक तुम्हाला मिळेल.
-
तुम्ही user info अंतर्गत मागितलेला तपशील भरा.
-
मग तुम्हाला पॅन क्रमांक दिला जाईल. त्यानंतर या पोर्टलवरून तुम्ही ई-पॅन डाउनलोड करू शकता.
योजनेविषयी महत्त्वाचे…
– ई-पॅन क्रमांक मिळाल्यानंतर तो अर्जदाराच्या ई-मेलवरदेखील पाठवला जाणार आहे. अर्थात हा ई-मेल आधार क्रमांकाशी संलग्न असेल तरच त्या ई-मेलवर ई-पॅन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
-
डिजिटल पॅन कार्ड मोफत दिले जाणार आहे.
-
वैध आधार क्रमांक असलेल्यांना तसेच आधारशी मोबाइल क्रमांक संलग्न असलेल्यांनाच ई-पॅन योजनेचा लाभ घेता येणार आहे.
-
पॅन कार्ड देण्याची सर्व प्रक्रिया कागदविरहित होणार आहे.