भारतीय स्टेट बँकेने (SBI) बचत खात्यातील रकमेवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात ०.०५ टक्के कपात केली आहे. त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेनेही बचत खात्यावरील व्याज ०.२५ टक्के अर्थात पाव टक्क्याने कमी केले आहे.

यामुळे स्टेट बँकेच्या बचत खात्यात असलेल्या रकमेवर आता २.७५ टक्क्यांऐवजी २.७० टक्के व्याज मिळणार आहे. ही व्याजदरकपात सर्व प्रकारच्या बचत खात्यांसाठी (Saving Account interest rate cut) करण्यात आली आहे. नवा व्याजदर ३१ मेपासून लागू करण्यात आल्याचे बँकेच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या!