पहिलं म्हणजे भारत आणि चीन हे दोन्ही देश जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य आहेत.

या संघटनेच्या नियमांनुसार मुक्त व्यापार पद्धती आहे आणि तुम्ही एखाद्या देशाच्या उत्पादनांवर बंदी आणू शकत नाही. तुम्ही एखाद्या कंपनीवर वितरकावर किंवा विक्रेत्यावरही बंदी आणू शकत नाही. तुम्ही बहिष्कार टाकू शकता आणि लोकांना या वस्तूंपासून दूर ठेवू शकता. पण ग्राहक त्यांच्या आवडीवरच चालतात. ग्राहकांना ओप्पो फोन आवडतो, कारण दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग, जपानी कंपनी सोनी किंवा तैवानच्या एचटीसीच्या निम्म्या किंमतीत चीनची ओप्पो कंपनी फोन देते. या किंमतींसाठी तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बहिष्काराचं आवाहन केलं जाऊ शकतं, पण आयात करण्याचा विक्रेत्यांचा अधिकार काढला जाऊ शकत नाही.

अभिप्राय द्या!