करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बँकिंग सेवेतील काही अटी आणि शर्ती तीन महिन्यांसाठी शिथिल केल्या होत्या. त्याची मुदत काल ३० जून रोजी संपली  आहे. १ जुलैपासून ग्राहकांना एटीएमचा अतिरिक्त वापर, खात्यात किमान शिल्लक नसल्यास भुर्दंड सहन करावा लागणार आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात २५ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यानंतर अर्थ खात्याने एटीएम वापराचे शुल्क तीन महिन्यांसाठी रद्द केले होते. ग्राहकांना एप्रिल ,मे आणि जून असे तीन महिने कोणत्याही बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढण्याची मुभा होती. यावर कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या होत्या. ३० जूनपर्यंत ही सुविधा होती. मात्र आजपासून  या सुविधा बंद आहेत.

अभिप्राय द्या!