कोविड-१९ (करोना) संसर्ग वाढतच असल्यामुळे सर्वच यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारे यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानेही (इरडा) यात पुढाकार घेतला असून नागरिकांना करोना उपचारांसाठी विमा संरक्षण देण्याकरता सर्व सर्वसाधारण (जनरल) आणि आरोग्य विमा कंपन्यांना लघु मुदतीची कोविड आरोग्य पॉलिसी देणे बंधनकारक केले आहे. या पॉलिसीला वैयक्तिक करोना कवच पॉलिसी असे इरडाने म्हटले असून ही पॉलिसी वरील दोन्ही विमा कंपन्यांनी १० जुलैपर्यंत देणे बंधनकारक आहे.
- Post published:July 5, 2020
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments