भारतातील वेगाने वाढणाऱ्या म्चुच्युअल फंडांपैकी एक असलेल्या मिराई अॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स इंडिया यांनी गुंतवणूकदारांसाठी मिराई अॅसेट बँकींग अॅण्ड पीएसयू डेट फंड बाजारात आणला आहे.
मुदतमुक्त रुपातील हा डेट स्वरुपातील फंड प्रामुख्याने बँका, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, सार्वजनिक वित्तीय संस्था आणि महापालिकांच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे.
 
गेल्या 8 जुलैपासून सुरू झालेल्या या फंडात 20 जुलैपर्यंत गुंतवणूकीची मुदत आहे.
 
निफ्टी बँकिंग आणि पीएसयु डेट इंडेक्समधील कंपन्यांमध्येच प्रामुख्याने गुंतवणूक केली जाणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन फंडाच्या स्थिर उत्पन्न विभागाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी महेंद्र जाजू हे करणार आहेत. फंडासाठी किमान गुंतवणूक पाच हजार रुपये असुन त्यानंतर एक रुपयाच्या पटीत कितीही गुंतवणूक करता येईल. मध्यम जोखीम घेत उत्तम परतावा मिळवून देणे हे फंडाचे मुख्य उद्दीष्ट आहे.
हा फंड फेरगुंतवणूक आणि विक्रीसाठी 27 जुलैपासून पुन्हा सुरु होणार आहे. या फंडात नियमित आणि थेट योजना असे दोन प्रकार असून, वृध्दी आणि लाभांश (वाटप आणि फेरगुंतवणूक) असेही त्यात पर्याय देण्यात आलेले आहेत.
 
फंडाची प्रमुख वैशिष्टे पुढीलप्रमाणे-
 
फंडातील निधी प्रामुख्याने ट्रीपल ए रेटींग असलेल्या उच्च दर्जाच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतविला जाणार आहे. 
सध्याची परिस्थिती पाहता सुरक्षित अशा स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक वाढविण्यास गुंतवणूकदार इच्छुक आहेत. सुरक्षा आणि रोखतेच्या काळजीबरोबरच मध्यम प्रकारची जोखीम घेत उत्पन्न मिळविण्याचे उद्दीष्ट मिराई अॅसेट बँकींग अॅण्ड पीएसई डेट फंडाने आखलेले आहे.
एक ते दोन वर्षाच्या कालावधीसाठी आपली बचत डेट फंडात गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड उत्तम पर्याय आहे !!

अभिप्राय द्या!