गेले महिनाभर दूरदर्शनवर म्युच्युअल फंड संदर्भात अनेक जाहिराती प्राईम टाईम मध्ये झळकताना दिसतात व त्यामधून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून भरघोस फायदा मिळवा हे सांगितले जाते. पण कसे? याचे विश्लेषण नसते आणि शेवटी मात्र “Read All Documents Carefully” हेही न चुकता दाखवितात.

यामध्ये गुंतवणूक करून फायदा कसा मिळवायचा यासाठी गुंतवणूकदाराला प्रथम आपली Long Term व Short Term उद्दिष्टे ठरवावी लागतात व त्यानंतरच कुठल्या फंडामध्ये किती रकमेने गुंतवणुकीची सुरुवात करावी याचा निर्णय घ्यावा लागतो.

श्री. सतीश यांना २० वर्षानंतर हीलस्टेशनवरील फार्म हाऊसमध्ये आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात उपभोगण्याची इच्छा आहे.

सौ. कुलकर्णी या सध्या खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात पण त्यांना निवृत्ती वेतनाची सुविधा कंपनीतर्फे दिलेली नाही.

श्री. देशपांडे कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे त्यांच्या बँकेतील चालू खात्यामध्ये काही पैसे विनावापर आहेत. पण येत्या दोन/चार महिन्यात शासकीय कामांच्या निविदा निघाल्यास त्यांना त्यापैकी काही रक्कम लगेचच लागू शकते.

डॉ. पुराणिक यांना आपल्या मुलाला उच्चशिक्षण देऊन आपल्याच व्यवसायात आपल्यानंतर स्थिरावलेले पहायचे आहे.

वरील प्रकारचे प्रश्न आपणा सर्वांसमोर असतात.

त्याचे वर्गीकरण आपण करू शकतो व दीर्घ मुदतीच्या लक्ष्यासाठी Equity संबंधित म्युच्युअल फंडमध्ये SIP करून उद्दिष्ठ किंवा उद्दिष्ठांसाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम जमवू शकतो.

निवृत्तीचे जीवन समाधानात व्यथित करण्यासाठी Retirement Benefit Pension फंडामध्ये दीर्घकाळ दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवून एक मोठी रक्कम निवृत्तीवेळी मिळण्याची आपली सोय आपण करून त्याद्वारे निवृत्त झाल्यावर Systematic Withdrawal Plan मध्ये गुंतवणूक करून चिंतामुक्त होऊ शकतो.

उच्चशिक्षणासाठी लागणारे खर्च दरवर्षी १०% पेक्षा जास्त वाढत असल्याने “पारंपारिक करिअर प्लॅन्स” उपयोगी पडत नाहीत असा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. व यासाठीसुद्धा Equity व Sectorial प्रकारच्या दोन म्युच्युअल फंडातील SIP द्वारे आपल्याला १३% ते १५% CAGR पद्धतीचे रिटर्न मिळू शकते व कुठलेही कर्ज न घेता आपल्याला अपेक्षित असलेली शैक्षणिक सुविधा आपण आपल्या पाल्याला देऊ शकतो.

दीर्घकालीन परताव्याच्या या सर्व योजनांद्वारे मिळणारे उत्पन्न टॅक्स फ्री असते हेही महत्वाचे.

म्हणून योग्य रित्या उद्दिष्ठ ठरवून म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक ही “सही है” असे आहेच!

अभिप्राय द्या!