जगातील सर्वात लोकप्रिय स्टॉकमध्ये पहिल्या स्थानावर चीनमधील इ कॉमर्स कंपनी अलीबाबा आहे. तर दुसऱ्या स्थानावर भारतातील खासगी क्षेत्रातील बँक आयसीआसीआयचा नंबर लागतो. ५९ विश्लेषकांनी ICICI बँकेला ट्रॅक केले आणि सर्वांनी बँकेचे स्टॉक खरेदी करा असा सल्ला (Buy call) दिला. ६४ विश्लेषकांनी अलीबाबाला ट्रॅक केले आणि त्यापैकी ६३ जणांनी त्याची खरेदी करण्याचा सल्ला दिला. तर एकाने होल्ड (Hold Call)वर ठेवण्यास सांगितले.

फायद्याचा विचार केल्यास आयसीआसीआय बँकेने गेल्या १० वर्षात शानदार कामगिरी केली आहे. बँकेने जुलै २०१० ते जुलै २०२० या काळात गुंतवणुकदारांना ८.७० टक्के रिटर्न दिलाय. तर या काळात सेन्सेक्समध्ये ७.८ टक्के इतकी वाढ झाली होती.

फक्त भारताबाबत रिटर्नचा विचार करता कोटक महिंद्रा बँकेने सर्वाधिक २१.६१ टक्के इतका रिटर्न दिला. तर एचडीएफसी बँकेने १८.४८ टक्के, युनियन बँक १६.४० टक्के, इंडसड बँकने ९.६३ टक्के रिटर्न दिलाय. अॅक्सिस बँकेत ४.४८ टक्के तर द फेडरल बँकेत २०१० पासून ते आतापर्यंत ५.३० टक्के वाढ झाली आहे. गेल्या १० वर्षात भारतीय स्टेट बँकेत २.२५ टक्के इतकी घसरण झाली.

अभिप्राय द्या!