वस्तू आणि सेवा कर संकलन, रेल्वेद्वारे मालवाहतुकीतील वाढ, पेट्रोलची वाढलेली मागणी, विजेचा पूर्वीच्या पातळीवर आलेला अत्युच्च वापर, इलेक्ट्रॉनिक पथकर संग्रहण वगैरे अर्थचक्र पूूर्वपदावर येत असल्याचे ठोस संकेत आहेत, असे प्रतिपादन भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयने मंगळवारी केले. हे पाहता करोनाबाधा आणि टाळेबंदीने ग्रासलेल्या अर्थव्यवस्थेत तीव्र स्वरूपाची उभारी दिसून येईल, असा विश्वासही या संघटनेने व्यक्त केला आहे.

ही खरोखरच आश्वासक चिन्हे असून, टाळेबंदी उठल्यानंतर अर्थव्यवस्थेत इंग्रजी आद्याक्षर ‘व्ही’ आकाराप्रमाणे तीव्र स्वरूपाची उभारी शक्य असल्याचे दिसून येते.

तथापि फेरउभारीची ही प्रारंभिक लक्षणे असून, त्यांना ठोस स्वरूप यावयाचे तर, टाळेबंदी आणि निर्बंधांसंबंधी देशाच्या कैक भागात असलेली अनिश्चितता लवकरात लवकर दूर केली जायला हवी.

अभिप्राय द्या!