करोना संसर्गामुळे वस्त्रोद्योग संकटात सापडला असला तरी मुखपट्टय़ांच्या (फेसमास्क) रूपाने या उद्योगाला संजीवनी मिळाली आहे. व्हीआयपी क्लोदिंग लि., रेमंड ते जिओर्दानो आणि वाइल्डक्राप्ट या विदेशी कंपन्यांही आता मुखपट्टय़ांच्या उत्पादनात उतरल्या आहेत.

भारतात मुखपट्टय़ांची बाजारपेठ १० ते १२ हजार कोटींची असल्याचा अंदाज व्हीआयपी क्लोदिंग लिमिटेडचे संचालक कपिल पाठारे यांनी व्यक्त केला. आंतर्वस्त्रांसाठी प्रसिद्ध या नाममुद्रेने ‘सेफ्टीवेअर’ विभागात प्रवेश करत मुखपट्टय़ांच्या निर्मितीस सुरुवात केली आहे.

अभिप्राय द्या!