महागाईच्या तुलनेत कमी परतावा मिळत असला तरी सध्याच्या अर्थसंकटात गुंतवणूकदारांचा कल बँकांमधील ठेवींकडेच अधिक राहिल्याचे स्पष्ट होत आहे. स्टेट बँकेच्या ताज्या अहवालातून गुंतवणूकविषयक कल अधोरेखित झाला आहे.
भारत हा बचतकर्त्यांचा देश समजला जातो. बचतीचा मोठा हिस्सा निश्चित उत्पन्न देणाऱ्या आणि परताव्याची खात्री असलेल्या विमा संलग्न आणि बँकांच्या मुदत ठेवीत गुंतविण्यात येतो.
घरगुती बचत खरेदी काही कालावधीसाठी लांबणीवर टाकू न उत्पन्नाचा काही हिस्सा ते बचत करीत असतात. खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजना महागाईपेक्षा कमी परतावा देतात, असे प्रबोधन म्युच्युअल फंडांकडून होत असते. असे असले तरी बचतीसाठी आजही ठेवीदार हे बँक ठेवींचा वापर करीत असल्याचे दिसते