मुंबईतील अनेक भागांत करोना नियंत्रणात येत असल्याने ५ ऑगस्टपासून सर्व दुकाने सातही दिवस खुली ठेवण्यास मुंबई पालिकेने परवानगी दिली. मद्य दुकानांनाही ग्राहकांना थेट विक्रीची मुभा देण्यात आली असून, मॉल आणि बाजार संकुलातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. त्यामुळे व्यवहारांना गती मिळणार असून, मुंबई हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबईत करोना रुग्णवाढीचे प्रमाण नियंत्रणात येताना दिसत आहे. अनेक भागांत रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांच्या पुढे गेला आहे. करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील सर्वच दुकाने ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्यास पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी परवानगी दिली.

अभिप्राय द्या!