सहा ऑगस्ट २०२०पर्यंत एक लाख रुपये मूल्याच्या सोन्यावर ७५ हजार रुपयांचे कर्ज मिळत होते. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर सात ऑगस्ट २०२०पासून संबंधिताला एक लाख रुपयांच्या सोन्यावर ९० हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. याचाच अर्थ आता एक लाख रुपयांच्या सोन्यावर १५ हजार रुपये अतिरिक्त कर्ज मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या नियमामुळे सर्वसामान्यांना आता कमी सोने तारण ठेवून अधिक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या बँका आणि वित्त संस्थांचा ‘गोल्ड लोन’चा व्याजदर

बँक/ एनबीएफसी गोल्ड लोन कर्जदर प्रक्रिया शुल्क
एसबीआय ७ ते ७.५० टक्के ०.५० टक्के
कॅनरा बँक ७.६५ टक्के
बँक ऑफ महाराष्ट्र ८ टक्के नियमानुसार
युको बँक ८.५० टक्के
इंडियन बँक ८.५० टक्के ते ८.७५ टक्के
लक्ष्मी विलास बँक ८.८० टक्के
साऊथ इंडियन बँक ८.८५ टक्के ते ९.३५ टक्के
पीएनबी बँक ८.६० टक्के ते ९.१५ टक्के एकूण कर्जाच्या ०.७५ टक्के
जम्मू काश्मीर बँक १० टक्के
करुर वैश्य बँक १०.८५ टक्के
ऍक्सिस बँक ९.७५ टक्के ते १७.५० टक्के १ टक्के + जीएसटी
कोटक महिंद्रा बँक १०.५ टक्के ते १७ टक्के २ टक्क्यांपर्यंत
एचडीएफसी बँक ९.९० टक्के ते १७.९० टक्के १.५० टक्के + जीएसटी
आयसीआयसीआय बँक १० टक्के ते १९.७६ टक्के कर्जाच्या १ टक्के
मुथूट फायनान्स १२ टक्के ते २७ टक्के
मन्नपुरम फायनान्स २९ टक्क्यांपर्यंत
फेडरल बँक ८.५० टक्क्यांपासून

अभिप्राय द्या!