चेकच्या संदर्भातील गैरव्यवहार रोखण्यासाठी बँकिंग प्रणालीत ‘पॉझिटिव्ह पे’ व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘पॉझिटिव्ह पे’ अंतर्गत चेक जारी करणारा ग्राहक लाभार्थ्याला चेक देण्यापूर्वी फोटो काढतो आणि नंतर हा फोटो बँकेच्या मोबाइल अॅपवर अपलोड करतो.
चेक पेमेंटची सुरक्षितता वाढवण्यासाठी ५० हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या सर्व चेकसाठी पॉझिटिव्ह पे व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यवस्थेच्या अंतर्गत बँकेला चेक जमा होण्यापूर्वीच समजते की कोणत्या लाभार्थ्याला तो देण्यात येत आहे. त्यामुळे हा चेक जेव्हा वटवण्यासाठी येतो, त्या वेळी बँक अधिकारी निधी हस्तांतर करण्यापूर्वी त्याच्या तपशीलांची खातरजमा करू शकतो. चेक अदा करणारा ग्राहक त्याचे तपशील बँकेच्या अॅपमध्ये देत असल्याने कोणताही गैरव्यवहार होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे चेकशी संबंधित गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होते.