करविस्ताराचा एक भाग म्हणून प्राप्तिकर विभाग करदात्यांना रिटर्न भरताना केलेल्या काही खर्चांचा तपशील भरण्यास सांगणार आहे. यामध्ये २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे हॉटेलचे बिल, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा आयुर्विम्याचा हप्ता, २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा आरोग्यविम्याचा हप्ता आदींचा समावेश आहे. शाळा किंवा कॉलेजमध्ये भरलेले व एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे वर्षभरासाठीचे शिक्षणशुल्क किंवा फी, विदेशप्रवास, बिझनेस क्लासमधून केलेला देशांतर्गत विमानप्रवास, दागिनेखरेदी, एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची पेंटिंगची खरेदी, डिमॅट खाती, बँकेतील लॉकर्स यांचाही तपशील प्राप्तिकर रिटर्नमध्ये द्यावा लागणार आहे. हा सगळा तपशील आर्थिक व्यवहार निवेदनात द्यावा लागेल. हे सर्व मुद्दे प्राप्तिकर विभागाने सध्या प्रस्तावित केले आहेत.

अभिप्राय द्या!