आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीतील अखेरच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरपासून काही बदल होत आहेत. या बदलांचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात होतील.

एक सप्टेंबरपासून विमान सेवा महाग होऊ शकते.

घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी होण्याची दाट शक्यता आहे. दरात मोठी कपात होऊ शकते. एक सप्टेंबर रोजी LPGच्या दरात बदल होऊ शकतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतात. या महिन्यात दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कर्जधारकांना मार्च महिन्यापासून हप्ता न देण्याची सवलत दिली होती. ही मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक पुढील आठवड्यात निर्णय घेणार आहेत. या संदर्भात बँकिंग सेक्टरमध्ये याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही.

केंद्र सरकारने अनलॉक-४ मध्ये १ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या काळात शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे.

Leave a Reply