अटल पेन्शन  योजनेत सभासदाला केवळ एप्रिल महिन्यातच आपल्या प्रिमियमच्या रकमेत (गुंतवणूक रक्कम) बदल करण्याची परवानगी होती. मात्र आता हा नियम शिथिल करण्यात आला आहे . आता या योजनेतील पेन्शनधारक वर्षातील कोणत्याही महिन्यात त्याची प्रिमियमची रक्कम कमी किंवा वाढवू शकतो. हा नियम शिथिल केल्याने ही योजना अधिक आकर्षक बनली आहे. हा बदल १ जुलैपासून लागू झाला आहे. त्यामुळे या योजनेत अनेक नवीन सभासद नव्याने जॉईन झाले आहेत !!

‘PFRDA’च्या सूचनेनुसार अटल पेन्शन योजनाधारक त्यांच्या वयानुसार वर्षातील कोणत्याही महिन्यात प्रिमियमची रक्कम कमी किंवा वाढवू शकतात. वयाच्या ६० वर्षांपर्यंत या योजनेत सभासदाला प्रिमियम भरायचा आहे. सध्या देशभरात अटल पेन्शन योजेनेचे २ कोटी २८ लाख सभासद आहेत. करोनाच्या संकटात अटल पेन्शन योजनेच्या सभासदांना तीन महिने प्रीमियम भरण्यापासून सूट देण्यात आली होती. मात्र आता १ जुलैपासून प्रीमियम पूर्ववत करण्यात आले असल्याचे पीएफआरडीएने म्हटलं आहे. चालू वर्षाचा प्रीमियम सभासदांच्या खात्यातून वजा केले जाणार आहे.

अभिप्राय द्या!