मला, प्रकर्षांने जाणवलेल्या काही गोष्टी ज्यामुळे गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग होतो त्या खालीलप्रमाणे आहेत.
१. अनेक म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक.
२. म्युच्युअल फंडाच्या एकसारख्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या फंड घराण्याचे फंड.
३. समभाग गुंतवणूक करताना स्वस्त समजून कमी किमतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक.
४. पोर्टफोलिओमध्ये शेअर्सची भेळ! म्हणजेच थोडय़ा थोडय़ा प्रमाणात अनेक शेअर्स.
५. गुंतवणूक होत आहे, परंतु कशासाठी, कधी – या गोष्टींबद्दल विचार केलेला नसल्याने, त्यातून कधी बाहेर पडायचं, किंवा कधी अजून वाढीव गुंतवणूक करायची याबाबत काही प्लॅन नाही.
६. गुंतवणूक केल्यानंतर तिचा योग्य आढावा घेतला गेला नसल्याने अपेक्षित परतावे न मिळता नुकसान झालेलं होतं.
७. जोखीम क्षमतेच्या पलीकडे जाऊन केलेल्या गुंतवणुकीतून आधी फायदा झाला. परंतु मार्केट पालटल्यावर त्याच गुंतवणुकीत नुकसान झालेलं आहे.
८. कोणताही अभ्यास न करता ‘टिप्स’च्या आधारे केलेल्या गुंतवणुका!
९. परताव्याची तुलना करताना चुकीचे मापदंड वापरणे.
१०. ‘स्टॉप लॉस’ म्हणजेच नुकसानाची मर्यादा न ठरवता, पुढे कधीतरी फायदा होईल या आशेने गुतंवणुकीतून बाहेर न पडणं.
वरील बाबी आपण अंगी बाणवू शकलो तर आपण अपेक्षाभांगापासून निश्चितच दूर राहू याची मला खात्री आहे !!