मध्यम वर्गीय किंवा ज्येष्ठ नागरिक एप्रिल / मे  महिन्यात हा फॉर्म भरण्यासाठी बँकेत जातात , व बँक अधिकारी सांगेल त्या ठिकाणी सह्या करून येतात . गेल्या काही वर्षात बहुतांशी बँकांचे core बँकिंग झाल्याने असे प्रत्येक बँकेत फॉर्म १५ G/H भरणे कदाचित धोकादायक होऊ शकते .

मुळात हा फॉर्म म्हणजे एक प्रतिज्ञापत्र आहे. ज्याचे उत्त्पन्न करमर्यादेपेक्षा जास्त आहे त्याने हा फॉर्म भरू नये . कारण आपल्याला बँकेत ठेवलेल्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजामधून TDS कापला जाऊ नये म्हणून आपण ह्या फॉर्मवरील सह्याद्वारे घोषणापत्र देतो व आपला उद्गमस्थानी  कर कपात करू नका असे बँकेला सांगत असतो. बँकेच्या एका शाखेतील व्याज जरी करकपातीच्या मर्यादेच्या आत असले तरी आपल्या सर्व बँकांतील  ठेवीवरील व्याज कदाचित करर्मर्यादेबाहेर जाऊ शकते आणि आपण या घोषणा पत्रातील मुख्य बाबीशीच प्रतारणा केल्यासारखे होऊ शकते .

सध्या संगणकाच्या एका क्लिकवर आपल्या सर्व ठेवींची माहिती IT कार्यालयाला प्राप्त होऊ शकते आणि आपण अडचणीत येऊ शकतो. म्हणून जर आपले सर्व उत्पन्न रू २.५० लक्ष पेक्षा कमी असेल तरच हा फॉर्म भरणे उचित आहे . त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेले सर्वजण return भरत असल्याने TDS कापून घ्या असेच बँकेला सांगणे आवश्यक आहे.आणि जर आपला अश्या प्रकारे कापलेला कर आपल्याला भरावयाच्या करापेक्षा जास्त झाला तर आपण तर आपण return सादर केल्यावर परतावा सुद्धा घेऊ शकतो .

ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही उत्पन्न मर्यादा रू. ३.0 लक्ष असून अति ज्येष्ठ नागरिकांना रू. पाच लक्ष आहे . त्यामळे TDS होऊ नये यासाठी उत्पन्न जास्त असताना असा फॉर्म भरणे चुकीचे होईल .

अभिप्राय द्या!