भारतीय अर्थव्यवस्था सध्या गतिमानतेच्या एका वेगळ्याच टप्प्यातून प्रवास करत आहे .व हा वेग जर असाच राहिला तर २०२२मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकते ,म्हणजेच जर्मनी व ग्रेट ब्रिटन यांना भारत मागे टाकू शकतो !!

मुंबई पुणे या express way वर दर शनिवार / रविवार आणि सुट्टीच्या दिवशी traffic jam असतोच . कोणत्याही जिल्हास्तरीय किवा तालुक्याच्या शहरात वाहन कोठे उभे करावे हे पाहण्यासाठी किमान अर्धा तास शोधाशोध करावी लागते .हेच काय पण  साध्या गल्लीबोळातसुद्धा वाहतूक खोळंबा होतोच . शाळा सुटण्याची वेळ कशी टाळायची हा प्रश्न पडला नसेल असा वाहनचालक नसावाच .

याचाच अर्थ हे सर्व रस्ते पाच वर्षात रुंद झालेच पाहिजेत . किंवा सक्षम वाहतूक पर्याय उभा होणे अपरिहार्य आहे .आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर चार माणसामागे एक वाहन आहे ! मोठ्या पर्यटन क्षेत्रात दोन दिवस राहण्याचे ठरविल्यास हॉटेल व्यवस्था किमान दोन महिने आधी करावी लागते , नाहीतर premium दराने भाडे  देण्याशिवाय पर्याय नसतो !

या सर्व बाबींचा एकच अर्थ निघतो ——————

तो म्हणजे ———

रस्ते रुंदीकरण होणारच ! राहण्यासाठी घरांचे बांधकाम होणारच ! प्रवासाच्या आधुनिक सुविधा व पर्याय उपलब्ध होणारच ! ” उडान ” सारख्या योजनेमुळे मोपा / चिपी / नवी मुंबई हे नव्याने होऊ घातलेले विमानतळ सुद्धा कमीच पडणार!

आणि म्हणून रिअल estate सेक्टर / सेवा क्षेत्र / telecom सेक्टर / वाहन व मेटल सेक्टर यामधील गुंतवणूक वाढतच राहणार ! आणि या सर्व कंपन्याचे समभाग आहेत त्यापेक्षा कितीतरी पट वाढू शकतात .अर्थात यामळे समभागधराकाना भरघोस परतावा मिळू शकतो .

यासाठी आज जरी सेन्सेक्स ३०००० हजार पेक्षा वाढला असला तरी “खाली आल्यावर मी खरेदी करेन ” असे म्हणणारे लोक हे ” वाटच “पाहत बसतील .

ज्यांना समभागामध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे वाटते त्यांनी balance किंवा equity फंडातील SIP सुरु करून या संधीचा फायदा उठविलाच पाहिजे !

आज बॅंक व्याजदर कमी झाले आहेत .पोस्ट ठेवीवरील दर सुद्धा केव्हाही उतरतील व पारंपारिक योजना या धोका देण्याची दाट शक्यता निर्माण झालीच आहे . पोस्टातील ठेवी व त्यांचे देय व्याज यातील घाटा ही १३५०० कोटीहून अधिक झाल्याने कोणतेही सरकार ह्याचा व्यावहारिक विचार हा करणारच आहे .

IRB सारख्या IPO मध्ये गुंतवणुकीसाठी परदेशी कंपन्या चातकासारखी वाट पाहतायत याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्था निश्चितच उभारणार आहे.म्हणून runway वरून उडान भरणाऱ्या व्यवस्थेत किंबहुदा या गतीमानतेत आपण सहभागी होण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाहीच नाही !!

प्रदीप जोशी  ९४२२४२९१०३

 

अभिप्राय द्या!