करोना आजारसाथीवरील उपचाराशी निगडित ‘करोना कवच’ नावाच्या प्रमाणित पॉलिसीची रचना केली जाऊन, ती सामान्य विमा तसेच आरोग्य विमा कंपन्यांकडून १० जुलैपासून सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. त्याच धर्तीच्या पॉलिसीधारकांना समजण्यास सोप्या जातील अशा विमा पॉलिसी विशिष्ट मानकांच्या आधारे आणल्या जाव्यात, या संबंधानेही विचार केला जात असल्याचे ‘आयआरडीएआय’चे अध्यक्ष सुभाष सी खुंटिया यांनी स्पष्ट केले. ते ‘सीआआय’द्वारे आयोजित विमा व पेन्शनविषयक वेवपरिषदेत बोलत होते.

करोना प्रतिबंधक लस ही वर्षअखेपर्यंत विकसित होऊन लोकांपर्यंत पोहचेल असे गृहित धरून, ‘करोना कवच’ या पॉलिसीचा मुदत कालावधी हा साडे तीन महिने ते साडे नऊ महिने या दरम्यान ठेवण्यात आला आहे. लवकर दृष्टिक्षेपात नसलेली लस आणि साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कमाल विमित रक्कम पाच लाख रुपये असलेल्या या पॉलिसीचा मुदत कालावधी समर्पक प्रमाणात वाढविण्यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे दिसत आहे !!

Leave a Reply