देशातील गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरुन सर्वात मोठं  अॅप ETMONEY ने बजाज फायनन्ससोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीद्वारे ऑनलाइन फिक्स डिपॉझिटची (एफडी) सुविधा देण्यात येणार आहे. या ऑफरमुळे गुंतवणूकदारांना ७.३५ टक्क्यांच्या शाश्वत परताव्यासह अत्यंत सोप्या पद्धतीने गुंतवणूक करता येणार आहे.

गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून भारतीयांनी नेहमीच फिक्स डिपॉझिटकडे एक वित्तीय साधन म्हणून पाहिलं आहे. दरम्यान, एफडीवर बँकांकडून दिलं जाणारं व्याजदर गेल्या काही वर्षात कमालीचं घटलं आहे आणि अनेक भारतीयांना यामुळे वाढत्या महागाईला अनुसरुन परतावा मिळत नाही. पण आता ETMONEY च्या ऑफरमुळे लाखो भारतीयांना बँकेच्या तुलनेत चांगल्या परताव्यासह गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

लवचिक व्याज देय, १२ ते ६० महिन्यांचा कालावधी पर्याय, ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर अशी या ऑफरची वैशिष्ट्ये आहेत. ETMONEY च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा फायदा म्हणजे अल्पकालावधीसाठी गुंतवणुकीची सुरक्षितता आहे आणि १०० टक्के पेपरलेस गुंतवणूक करता येईल.

अभिप्राय द्या!