भारतीय गुंतवणूकदारांचा आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणूक करण्याचा कल वाढत असल्याने अनेक फंड घराणी अशा प्रकारचे फंड भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देत आहेत.

वार्षिक ६ ते ७ टक्के दराने वाढण्याची शक्यता असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेतील निवडक समभागांबरोबरीनेच, आकाराने जगातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठय़ा कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या फंडाची प्राथमिक विक्री २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. प्रिन्सिपल म्युच्युअल फंडांचा ‘प्रिन्सिपल लार्जकॅप फंडा’ची प्राथमिक विक्री त्यापैकीच एक. हा फंड एकूण मालमत्तेच्या कमाल ८५ टक्के मालमत्ता भारतात सूचिबद्ध असलेल्या लार्जकॅप कंपन्यांत, तर कमाल १५ टक्के गुंतवणूक अमेरिकेत सूचिबद्ध असलेल्या लार्जकॅप कंपन्यांत करणार असल्याचे ‘सेबी’कडे दाखल केलेल्या माहितीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. भौगोलिक वैविध्य आणि लार्जकॅप गुंतवणूक असलेला या प्रकारचा फंड भारतीय गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच उपलब्ध झाला आहे. या फंडासारखा दुसरा फंड उपलब्ध नसल्याने एका अर्थी हा फंड अद्वितीय म्हणायला हवा.

हा फंड एकूण मालमत्तेच्या कमाल ८० टक्के गुंतवणूक भारतीय लार्जकॅप कंपन्यांच्या समभागात करणार असल्याने हा फंड लार्जकॅप गटात स्थान मिळण्यास पात्र ठरतो. उर्वरित १५ टक्के गुंतवणूक अमेरिकेत सूचिबद्ध आणि ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक भांडवली मूल्य असलेल्या कंपन्यांत करण्यात येईल.

यात आपल्याला गुंतवणूक करावयची असल्यास आपण  शेरखान कार्यालय पाटील टोवेर्स गवळी तिठा सावंतवाडी येथे संपर्क करावा !!

प्रदीप जोशी ९४२२४२९१०३

अभिप्राय द्या!