गुंतवणूकदारांसाठी मिरे एसेट अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड हा नवीन मुदत मुक्त श्रेणीतील (ओपन एंडेड) फंड बाजारात आणला आहे. अवघ्या तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ( मॅकॉले ड्युरेशन) गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना डोळ्यासमोर ठेवत हा फंड आणण्यात आला आहे. नवीन फंड गुंतवणुकीसाठी खुला झाला असुन येत्या ६ ऑक्टोबरला बंद होणार आहे.

प्रामुख्याने तीन ते सहा महिन्यांचा कालावधी असलेल्या रोखे आणि चलन बाजारातील साधनांमध्ये गुंतवणूक करत परतावा मिळविण्याचे मिरेच्या या नवीन फंडांचे उद्दीष्ट आहे. मुदतमुक्त श्रेणीतील ही डेट योजना आपला १०० टक्के निधी हा अल्प ते मध्यम जोखीम असलेल्या रोखे आणि चलन बाजारातील साधनांमध्ये गुंतविताना ट्रीपल अथवा ए प्लस श्रेणी लाभलेल्या उच्च दर्जाच्या साधनांवरच अधिकाधिक भर देण्यावर लक्ष केंदीत करणार आहे. नवीन फंडाचे व्यवस्थापन डेट विभागाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी महेंद्र जाजू हे सांभाळणार आहेत. या फंडासाठी निफ्टी अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन डेट निर्देशांक आधारभूत धरला जाणार आहे. या फंडासाठी एक्सिट लोड नसल्याने गुंतवणूकदारांना अधिक लवचिकता मिळवून देतो.

Leave a Reply