डायव्हर्सिफिकेशन ( विवीधीकरण)
कोणतीही गुंतवणूक करताना आपण चार पैलू तपासतो.
१.सुरक्षितता २. रोकड सुलभता ३.जोखीम (Risk) आणि कर कार्यक्षमता.
आज आपण डायव्हर्सिफिकेशन पाहणार आहोत.यापूर्वी आपण या सदरातून अनेक वेगवेगळे फंड व त्याचा परतावा पाहत होतो.पण त्या फंडातील गुंतवणूक ही भारतीय कंपन्यामधील समभागात होत होती.पण आज मी आपल्याला ४ नवीन फंड खरेदीसाठी सुचवित आहे. की ज्यामधील गुंतवणूक ही
अमेरिकन किंवा परदेशातील मोठ्या कंपन्यांच्या समभागात केली जाते.व त्याचा परतावा हा जास्त चांगला मिळालेला दिसतो.
१. फ्रँकलिन इंडिया फीडर -म्हणजेच युएस ऑपरच्युनिटी फंड- परतावा १८% पेक्षा जास्त.
२. आय्.सी.आय्.सी.आय्.प्रू.युएस ब्लुचीप फंड -परतावा १५% पेक्षा जास्त
३. डी.एस्.पी.वर्ल्ड गोल्ड फंड- परतावा १८% पेक्षा जास्त
४ .मोतीलाल ओसवाल नॅसडॉक १०० इटीएफ -परतावा २४ % पेक्षा जास्त
या फंडामध्ये आपण जरी गुंतवणूक भारतीय रुपयामधून करीत असलो तरी याचा परतावा वाढीव असण्याचे मुख्य कारण म्हणजे रुपया व डॉलर यातील विनिमय दरात होत असणारे बदल हेही असते.तसेच अॅमेझान,अॅपल, किंवा तत्सम मोठ्या कंपन्यामधून गुंतवणूक फार चांगला परतावा देत असते.त्यामुळे आपले उत्पन ब-यापैकी वाढू शकते.
मात्र अशा फंडामध्ये गुंतवणूक करताना त्या देशाची अर्थव्यवस्था, तेथील धोरणे आणि राजकीय स्थैर्य यावर सुध्दा परतावा अवलंबून राहात असल्याने आपण आपली सर्व पुंजी अशा फंडात एकाच वेळी न गुंतविता STP चा अवलंब करून तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊनच करणे हितावह राहील.
मात्र जास्त परतावा घेण्यासाठी आपल्याला आता अशा प्रकारचे फंड निवड करण्याची वेळ आली आहे हे निश्चित.

आणि यालाच मी फंड निवडीचे विवीधीकरण (Diversification) असे वेगळ्या अर्थाने म्हणत  आहे.

अभिप्राय द्या!