भारतातील कमॉडिटी डेरिव्हेटिव्हजमधील सर्वात मोठा बाजारमंच असलेल्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (एमसीएक्स) कडून आज देशातील पहिल्यावहिल्या व्यवहार करण्यायोग्य रिअल-टाइम बेस मेटल इंडेक्सवर म्हणजेच एमसीएक्स आयकॉमडेक्स बेस मेटलवर (मेटलडेक्स) वायदा व्यवहार खुले करण्यात आले.

एक्सचेंजने मेटलडेक्सवर नोव्हेंबर २०२०, डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ या कालावधीत मुदतपूर्ती होणाऱ्या फ्युचर्स अर्थात वायदे सौद्यांना सुरुवात केली. कमीतकमी सलग तीन महिन्यांसाठी कॉन्टंसाठी कॉन्ट्रॅक्ट्स यात सर्व वेळी उपलब्ध असतील. या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टचे आकारमान हे एमसीएक्स आयकॉमडेक्स बेस मेटल्स इंडेक्सच्या ५० एककांची बरोबरी साधेल. तर कॉन्ट्रॅक्टसाठी टिक साइझ (किमानतम किंमत हालचाल) ही १ रुपया असेल. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टची मुदत संपल्यानंतर रोख रकमेवर त्यांचा निपटारा (सेटलमेंट) केला जाईल. अंतिम निपटारा किंमत (सेटलमेंट प्राइस) ही मूलभूत घटकांच्या व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइस (व्हीडब्ल्यूएपी) वर आधारित असेल जी इंडेक्स फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टच्या समाप्तीच्या दिवशी सायंकाळी ४.०० ते ५.०० या दरम्यान असणाऱ्या किमतीवर बेतलेली असेल.

एमसीएक्सवर व्यवहार होणाऱ्या बेस मेटलच्या रिअल-टाइम कामगिरीचा म्हणजेच झिंक (५ मेट्रिक टन), कॉपर (२.५ मेट्रिक टन), निकेल (१.५ मेट्रिक टन), लेड (५ मेट्रिक टन) आणि अँल्युमिनियम (५ मेट्रिक टन) यांचा हे सेक्टोरल इंडेक्स मागोवा घेईल. सध्याच्या या इंडेक्समध्ये झिंकचा ३३.०६ टक्के भारांक, कॉपर २९.८१ टक्के, निकेल १४.७७ टक्के, लेड १२.८८ टक्के आणि अँल्युमिनियमचा उर्वरित ९.४८ टक्के भार असेल.

अभिप्राय द्या!