करोनाकाळात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून कमाई करण्यावर आणि गुंतवणूक वाढवण्यावर भर दिल्याचे असून आले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक डीमॅट खाती उघडण्यात आली आहेत. भांडवल बाजार नियामक सेबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) ६३ लाख नवी डीमॅट खाती उघडण्यात आली आहेत.

गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत २७.४ लाख नवी डीमॅट खाती उघडण्यात आली. याचा अर्थ डीमॅट खाती उघडण्याच्या संख्येत यंदा १३० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२० या कालावधीत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय शेअर बाजारांमध्ये ११ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. जगभरातील अन्य अर्थव्यवस्थांमध्ये याच कालावधीत विदेशी गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याचेही दिसून आले.

Leave a Reply