आर्थिक वर्ष २०१९-२० ची उत्पन्नविषयक कायदगपत्रांची जुळवाजुळव करणाऱ्या करदात्यांना आज सरकारने सुखद धक्का दिला. २०१९-२० या वर्षाचा आयटी रिटर्न सादर करण्यासाठी सरकारने आणखी एक महिन्याने मुदत वाढवली आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत करदाते आपला रिटर्न फाईल करू शकतील, असे अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न सादर करणाची अंतिम मुदत दोन वेळा वाढवण्यात आली आहे. याआधी दरवर्षीप्रमाणे ३१ जुलै २०२० होती. मात्र करोना प्रकोप आणि टाळेबंदी यामुळे केंद्र सरकारने याला पहिल्यांदा मुदतवाढ दिली. ही मुदत ३१ जुलैवरून वाढवून ती ३० नोव्हेंबर २०२० करण्यात आली आहे. त्याला आज पुन्हा एकदा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत २०१९-२० या वर्षाचा आयटी रिटर्न सादर करता येईल.

Leave a Reply