कोटक महिंद्रा बँकेचे प्रवर्तक आणि सर्वात मोठे भागधारक उदय कोटक हे इंडसइंड बँकेच्या प्रवर्तकांचा हिस्सा खरेदी करण्याच्या प्रयत्नांत असून, उभयतांमध्ये या संदर्भात वाटाघाटीही सुरू झाल्या असल्याचे वृत्त आहे.

खासगी क्षेत्रातील नव्या पिढीच्या या बँकांचे एकत्रीकरण ही भारतीय बँकिंग क्षेत्रातील एक लक्षणीय घटना ठरेल, शिवाय कोटक महिंद्र बँकेच्या किरकोळ बँकिंगमध्ये स्थान वृद्धिंगत करण्यास ते उपकारक ठरेल. इंडसइंड बँकेचे प्रवर्तक हिंदुजा बंधू आणि उदय कोटक यांच्यात प्राथमिक बोलणी झाली असून दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या, असे वृत्तसंस्थेने या बैठकीला उपस्थित सूत्रांच्या हवाल्याने स्पष्ट केले आहे.

अभिप्राय द्या!