बँकांचे शेअर्स चांगला परतावा देतात हा माझा अनुभव. पण ह्याला बँक of इंडिया व महाबंक यांनी मात्र समभाग धारकांना धोका दिला आहे
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या आवडत्या शेअर्सची यादी काढली, तर त्या यादीत अनेक बॅंकांचे शेअर अग्रभागी येतील. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बॅंका महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योग- व्यवसायांच्या भरभराटीसाठी आवश्यक असलेले स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि सामान्य लोकांच्या सर्व कर्जांच्या गरजा भागविणाऱ्या बॅंकांचे महत्त्व भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत खूप आहे. यामुळेच उत्तम बॅंकांचे शेअर आपल्याकडे असावेत, असे प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे. वेगाने व्यवसाय वाढणाऱ्या बॅंकेचा शेअर किती फायदा मिळवून देऊ शकतो, याचे उदाहरण पाहायचे असल्यास येस बॅंकेच्या शेअरकडे पाहता येईल.
एप्रिल 2016 ते मार्च 2017 या एका वर्षात या शेअरने जवळजवळ 100 टक्के परतावा दिलेला आहे. अशा वेगवेगळ्या बॅंकांच्या शेअरमध्ये एकत्रित गुंतवणूक करण्यासाठी बॅंकिंग म्युच्युअल फंड अतिशय योग्य ठरतात. उदाहरणार्थ, रिलायन्स बॅंकिंग फंड. या फंडात गुंतवणूक केल्यास एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक, येस बॅंक, फेडरल बॅंक यांसारख्या बॅंकांच्या शेअरमध्ये एकत्रित गुंतवणूक केल्याचे फायदे मिळतीलच; शिवाय रिलायन्स कॅपिटल, मुथ्थुट फायनान्स यांसारख्या आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमधील गुंतवणुकीचादेखील फायदा मिळेल. वर्ष 2003 मध्ये मे महिन्यात बाजारात आलेल्या या फंडाने गेल्या चौदा वर्षांमध्ये सरासरी 25 टक्के करमुक्त वार्षिक परतावा दिलेला आहे. अर्थातच हा परतावा त्या फंडात समाविष्ट असलेल्या बॅंकांच्या उत्तम कामगिरीचा परिपाक आहे. तेच UTI च्या बँकिंग व finance फंड सुद्धा कायमच चांगला परतावा देत आला आहे . कालच बँकांचे NPA संबंधात सरकारने चांगला निर्णय घेतला आहे त्याचाही सकारात्मक परिणाम या फंडावर होणारच !!
म्हणून सामान्य गुंतवणूकदारांनी एखाद्या बँकेचे शेअर घेण्यापेक्षा त्यांचा सहभाग असलेला म्युच्युअल फंड शोधून त्यामध्ये SIP करणे निशितच फायादाचे होऊ शकते !!
Nice Post
thanks nana !!