सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख इंधन कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) संचालक मंडळाने समभाग पुनर्खरेदीला मंजुरी दिली आहे. या पुनर्खरेदीनुसार १० कोटी शेअर परत घेतले जाणार आहेत. हे प्रमाण कंपनीच्या एकूण भरणा केलेल्या भागभांडवलाच्या (पेडअप इक्विटी कॅपिटल) ६.५६ टक्के आहे.

प्रति समभाग २५० रुपयांप्रमाणे पुनर्खरेदी करणार आहे. कंपनीच्या सध्याच्या समभागाच्या किंमतीनुसार गुंतवणूकदारांना २४ टक्के प्रीमियम मिळणार आहे. गुरुवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर एचपीसीएलचा समभाग ७.५८ टक्क्यांच्या तेजीसह २०१.५० रुपयांवर होता.

अभिप्राय द्या!