खासगी क्षेत्रातील आघाडीची कोटक महिंद्र बँकindusind bankताब्यात घेण्याची शक्यता आहे.  हा व्यवहार झाल्यास मत्तेच्या दृष्टीने कोटक महिंद्र देशातील सर्वांत मोठी आठवी बँक होण्याची शक्यता आहे.  या व्यवहारामुळे कोटक महिंद्र बँकेची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल. बँकेच्या मत्तांमध्ये (अॅसेट) जवळपास ८५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

उदय कोटक इंड्सइंड बँकेत ताब्यात घेऊन आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्याचे अस्तित्त्व संपुष्टात आणण्याची शक्यता आहे. दोन्ही बँकांचे एकत्रीकरण झाल्यानंतर कोटक महिंद्र बँकेची एकूण मत्ता सात लाख कोटी रुपयांवर (९५० अब्ज डॉलर) जाऊन अॅक्सिस बँकेनंतर ती देशातील खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बँक होईल.

अभिप्राय द्या!