गोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी
भारतीय लोकांना कोणत्याही शुभप्रसंगी सोने खरेदी करण्याची पारंपारिक सवय आहे. पण प्रत्यक्ष खरेदी केलेल्या सोन्यामधील गुंतवणूक सोने विकून गरजेच्या वेळी सोडवून घेणे थोडेसे गुंतागुंतीचे असते किवा अशा अत्यंत गरजेच्या वेळी “सोनेतारण कर्ज घेणे “ आवश्यक ठरते.
नेमकी हीच गरज ओळखून भारत सरकारने “Sovereign Gold bonds” ही योजना सर्वसामान्यांसाठी सुरु केली आहे.
यामध्ये कोणतीही व्यक्ती १ ग्रॅम पासून ४ किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो व हे सोने प्रत्यक्ष हातात न देता ते आपल्या demat खात्यात जमा होते. आणि ५ वर्षानंतर केव्हाही आपण त्यावेळी जो बाजारभाव असेल त्याप्रमाणे त्याची विक्री करू शकतो आणि कोणतीही वजावट न होता त्यावेळच्या सोन्याच्या किमंतीनुसार पूर्ण रक्कम एका दिवसात आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकते.यामध्ये कोणतीही फसवणूक आणि चोरी होण्याचा धोका नाही तसेच आपल्याला वाटले तरच आपण ही विक्री करावी अन्यथा नाही केली तरी चालते.
अशा पद्धतीत सोने खरेदीची संधी ९ november ते १३ नोवेंबर मध्ये उपलब्ध आहे .
फक्त यासाठी आपले DEMAT खाते असणे आवश्यक आहे असे demat खाते उघडण्यासाठी आपल्याला काहीही खर्च येत नाही.
आत्ता या खरेदीसाठी रु 5127 /- प्रती ग्रॅम हा भाव निश्चित झाला आहे !!
मात्र अशा खरेदीसाठी आवश्यक ती रक्कम आपल्या demat खात्यात आपल्याला एक दिवस आधी जमा करावी लागते किंवा नेट बँकिंगने अदा करण्याची तयारी ठेवावी लागते.
माझे या सदरच्या वाचकांना, आत्ता उपलब्ध होणारे हे sovereign Gold Bonds खरेदी करण्याचे आवाहन असून यासंबधी अधिक माहिती हवी असल्यास माझ्याशी संपर्क साधण्यात यावा, ही विनंती.
प्रदीप जोशी
(९४२२४२९१०३)