कोकणातल्या बहुतांशी रस्त्यावरून फिरताना वेडीवाकडी वळणे , सावकाश जा हा फलक कायमच दिसतो.

तसेच शेअर  बाजारात चढ-उतार ही नित्याची बाब आहे; पण आपण गुंतवणूकदार त्यास कसे सामोरे जातो, त्याच्यावर आपला फायदा व तोटा ठरत असतो. त्या अनुषंगाने आपण आपल्या गुंतवणुकीवर बारीक लक्ष ठेवणे हे महत्वाचे असते. गुंतवणूक मध्यम काळासाठी असो वा दीर्घकाळासाठी, तिच्यावर लक्ष ठेवावेच लागते;. अमुक कंपनी ही “ब्लू चिप’ आहे, त्यामुळे त्यात नुकसान होणार नाही, ही मानसिकता गुंतवणूकदारांनी बदलली पाहिजे. बाजारातील तेजीला भुलून न जाता जागरूक राहून आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेत राहणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने

1) प्रवर्तकांनी कंपनीतील आपली हिस्सेदारी मोठ्या प्रमाणावर कमी करणे अथवा करत राहणे,

2) कंपनीवरील कर्ज वाढत जाणे व त्यासाठी प्रवर्तकांनी आपला हिस्सा तारण ठेवत राहणे,

3) हळूवारपणे नफा घटत जाणे व तोट्याकडे वाटचाल वाढणे,

4) चांगला नफा असूनही लाभांश न देणे,

5) उलाढालीत वाढ व नफ्यात घट.

या बाबी खूप महत्वाच्या आहेत

शेवटी लक्षात ठेवा, बाजारात संधी ही कायमच असते… ती शोधून त्यावर अंमलबजावणी करणे हे अधिक महत्त्वाचे असते. यासाठी या क्षेत्रातील अनुभवी, सल्लागारांचे मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करणे कधीही इष्ट ! व म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सोपी आपल्याला कमी त्रास देणारी ठरते , पण योग्य सल्लागाराचा सल्लाही तेवढाच महत्वाचा !!

अभिप्राय द्या!